शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

ब्लॉगदेवाची कहाणी !


ऐका ब्लॉगदेवा तुमची कहाणी ! 

 

निर्मळ मळे, विचारांचे तळे, कल्पनांचा वृक्ष, अक्षरांची कमळे ! 

 

मनातला विचार शब्दांत धरावा; ब्लॉग रचून व्यक्त करावा.
'हा' वसा कधी घ्यावा ?

 

'हा' वसा कधीही घ्यावा, परंतु कधीही अर्धवट न  सोडावा.
उतू नये, मातु नये, घेतला वसा टाकू नये.

 
 
ह्या वश्यामध्ये काय करावे ?

  

मनात ऊन-पावसाचा खेळ रंगवावा, कल्पनेच्या हिरवळीवर विसावा घ्यावा. 

 

आपले विचार लिहून काढावेत, सतत व्यक्त  करीत राहावे, मन सतत कोरडे करावे.

 

ऐसा हा मनीचा खेळ मनी रंगविजे, मनी खेळविजे 

 

ऐशी हि साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण !         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा