'तुम्ही' दुर्घटनेचा फायदा घेऊन आपलीच टिमकी कितीही वाजवलीत;
तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
'तुम्ही' दुर्घटनेच्या संधीचा फायदा स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी करून घेतलात; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
'तुम्ही' शोधकार्यात व्यस्त असलेल्यांच्या कार्यात व्यत्यय आणून त्यांच्या प्रतिक्रिया घेत राहिलात; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
'तुम्ही' दुर्घटनाग्रस्तांच्या हवालदिल नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलेत; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
'तुम्ही' बेपत्ता झालेल्या माणसाच्या ५ वर्षांच्या मुलाला धरून विचारलंत "तुला तुझ्या बाबांना काही सांगायचंय का?"; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
'तुम्ही' दहशतवादी हल्ल्याच्या वेळेला 'त्या' जागेत माणसे नेमकी कुठे लपून बसलीत हे जाहीर केलंत; तरीही आम्हीही काहीही बोलायचे नाही ?
इतकंच कशाला,
दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे दुर्दैवी मृतदेह आपल्याचकडे पहिल्यांदा दिसावेत यासाठी तुम्ही पंचनाम्यात अडथळे आणू पाहिलेत; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
...
...
...
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या सो काॅल्ड मिडीयाला सर्वसामान्य नागरिकांनी विचारली नाहीत; तरीही आम्ही काहीच बोलायचे नाही ?
उलट सर्वसामान्य नागरिकांनी अशा वार्ताहरांना पाठीशी घालून लोकशाहीचा चौथा खांब पूर्णतः पोखरला जावा आणि लोकशाहीचा मांडव पूर्णतः कोसळावा याची खबरदारी घेतली; तरीही आम्ही काहीही बोलायचे नाही ?
असो ! शेवटी काय तर #यह_इंडिया_है_यहाँ_ऐसाही_चलता_है |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा