स्थळ :- कैलासनगरातली गणेशची बेडरूम
श्रीकृष्ण यादव :- अरे ए गणेशा, काय म्हणतोयस ?
गणेश :- ये मामा, काय म्हणतोयस बाकी, आज युनिव्हर्सल कॉम्पलायन्सच्या कामातून वेळ काढून, द्वारीकापुरीतून डिरेक्ट कैलाशनगरात कसं काय ?
श्रीकृष्ण :- अरे, ते काम तर रोजचंच आहे पण आज पृथ्वीपुरात गेलो होतो. तुला तर माहितीय, आपण दरवर्षी आपला हॅप्पी बड्डे पृथ्वीपुरातच साजरा करतो. म्हणूनच आजही गेलो होतो.
गणेश (वाक्य तोडत) :- अरे हो, मामा, तुझा वाढदिवस झाला ना रे, बिलेटेड हॅप्पी बर्थडे, मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑ दिस डे मे कम टू युअर लाईफ ! (असं म्हणत कोपर्यातलं गिफ्टरॅप त्याला दिलं) मस्त बासरी आहे ह्यात, उघड आणि वाजवून दाखव.
श्रीकृष्ण :- अरे नको रे, निदान अजून काहीतरी दिवसतरी काहीही ऐकायची इच्छा नाहीय माझी, अगदी बासरी आणि पावा सुद्धा !
गणेश :- काय रे मामा ? एवढं का वैतागलास ?
श्रीकृष्ण :- काही नाही रे, नेहमीचंच ! नेहमीप्रमाणे याहि वर्षी ह्या माणसांनी, गोविंदापथकांनी धिंगाणा घातला.
दरवर्षी सारखेच याहीवर्षी माझ्या नावाने स्वतःच्या जीवाशी खेळले.
गणेश :- अरे पण भारतवर्षातल्या न्यायालयाने कायद्याने बंदी आणली होती ना रे ?
श्रीकृष्ण :- हरताळ फासला बंदीला आणि धिंगाणा सुरूच होता आजही.
अरे मेल्यांनो, आम्ही हे खेळ आमच्या जीवाशी खेळून कधीच नाही रे खेळलो, उंचावर टांगलेल्या शिंकाळ्यात गोपिकांनी लपवलेलं दही-लोणी वगरे खाण्यासाठी मी माझ्या सवंगड्यांसोबत ह्या 'बाललीला' केल्या. आणि हे ८वर्षांपासून ते ४०वर्षांपर्यंतचे तरुण मात्र आमच्या नावावर दारू पिऊन स्वतःच्या जीवावर उदार होणार.
डोंबिवली-कल्याणमध्ये तर अपघातसुद्धा झालेत, १३ वर्षांचा सुजल तर जबर जखमी झाला रे.
हा एक खेळ न राहताना 'कम्पिटिशन' झालीय रे हि.
गणेश :- एवढं झालंय ?
श्रीकृष्ण :- एवढंच कसं होईल ? ह्यांच्या धिंगाण्याला कधी अंत असतो का रे ?
मद्यपान करून 'झिंगाट' झाल्यावर डीजे वगरे लावून अश्लील गाण्यांवर बेभान नाचायचं, अश्लील चाळे करायचे हे हल्ली कुठल्याही उत्सवाचं अंतिम उद्दिष्ट झाल्यासारखं वाटू लागलंय मला.
त्यात सोबतीला त्या 'रिंकू' सारख्या इतर चिंकू, मिनकू,पिंकु वगरे फिल्मस्टार्स असतातच त्यांना बिथरवायला.
लाखलाख रुपये घेतात रे त्या येण्याचे, बरं हि सगळी 'अलक्ष्मी'ला 'लक्ष्मी' भासवण्याची कामं, ते जनतेचे सेवक म्हणून नेमलेले प्रतिनिधी खाल्लेली लाच बाहेर काढतात अशा रूपात पण गोविंदा पथकांना काय ना त्याचं ? त्यांना पैसा मिळाला, बास !
बरंच काही झालंय, तू अजून ऍडल्ट नाहीयेस, त्यामुळे तुला अनेक घटना सांगूसुद्धा शकत नाही. म्हणूनच आज कुठेही जायची इच्छा नसताना आलो तुला भेटायला.
तू जातोयस ना पृथ्वीपुरात ५ सप्टेंबरला ?
फक्त १० दिवस राहिलेत, म्हणून सांगायला आलो कि जाण्याआधीच मनाची तयारी करून ठेव.
फक्त एका दिवसात माझी सुटका झाली रे, तुला मात्र तिकडे सक्तीचे १०दिवस कसेतरी काढावे लागणार आहे. ऑप्शन नाही रे दुसरा ! 😥
गणेश :- य्यो डुड, मामा, हा बघ आयपॉड, ह्यात ना तुझ्या आत्तापर्यंतचे सगळे अल्बम्स आहेत.
मी कानात ब्ल्यूटूथ हेडसेट अडकवून मस्त बासरी ऐकणार १०दिवस !
जर मनात भक्तिभाव असलेला माणूस जवळ आला तर अंतर्ज्ञानाने कळेलच, पण एरवी मस्त हॉलिडेज एन्जॉय करणार मी !😉
- ®सर्वेश्वर©
दि २६/८/१६ रात्रौ १.५४ वाजता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा